पाताळामध्ये महादेव हाटकेश्वर या रुपान महादेव मराठी lyrics Gane Naliche
पाताळामध्ये महादेव हाटकेश्वर या रुपान
देवाचे बोल लय अनमोल घेऊ रे मुखान
बसला पाताळामध्ये महादेव हाटकेश्वर या रुपान
काली पार्वतीच रूप
तिला क्रोध आलाय खुप
देव दानव तिला कप
शंकर पायाखाली झोप
दैत्य रक्षणासाठी शंभु बसलाय लिंगाच्या रुपान
बसला पाताळामध्ये महादेव हाटकेश्वर या रुपान
गुरूदाताची आज्ञा झाली
नऊ नाथांनी ती पाळली
झोळी काखेत घातली
नाथांनी पातळी स्वारी केली
नाथांनी हाटकेश्ववर प्रसन्न केले मंत्राच्या जपान
बसला पाताळामध्ये महादेव हाटकेश्वर या रुपान
नाथ अलख बोलले
रस्ते मोकळे ते झाले
नाथ धरणी वरती आले
काली युगी प्रसिध्द झाले
जगकल्यानासाठी आले नव नारायण मानव रुपान
बसला पाताळामध्ये महादेव हाटकेश्वर या रुपान
लेबल: देवाचे गाणे, देवीची गाणे