अगं तुझी गं कृपा झाली तरी नवस फेडीते marathi song lyrics
अगं तुझी गं कृपा झाली तरी नवस फेडीते
अगं तुझी गं कृपा झाली तरी नवस फेडीते
या तान्हा बाळाचं बाई मी जाऊ काढीते
अगं रांजले गं गांजले सुकले ते नयन
एकटीच होते भाऊ नव्हते रे संतान
तुझं ग नाव घेऊन आई हात मी जोडीते
या तान्हा बाळाचं बाई मी जाऊ काढीते
अगं उदासले मन माझे लागे जीवाला ठेच
केद्राईच सत्व ऐकून खेटी केल्या पाच
केद्राई मातेला जाऊन नवस बोलते
या तान्हा बाळाचं बाई मी जाऊ काढीते
अगं तुझ्या प्रसादन गर्भ अंकुर फुटला
झाले मला गं बाळ काळ दुःखाचं लोटला
केदू नाव ठेऊन त्याला हका मारीते
या तान्हा बाळाचं बाई मी जाऊ काढीते
लेबल: देवीची गाणे

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
Hi
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ