ओम नमो भगवते तुझा सुंदर अवतार | deviche geet Marathi lyrics
ओम नमो भगवते तुझा सुंदर अवतार
ओम नमो भगवते तुझा सुंदर अवतार
नंदिवर बसून चालली सुंदर नार
तिन्ही तालाची खोलून पेटी , तीन केला शिंगार
मारुतीचा टोप दोहीवर , कानी कुंडल भार
सिता माईची नथनी तीन घातली नाकात
लक्ष्मीचा हार तीन तो घातला गळ्यात
ब्रह्म विष्णू दोघं जण वेण्याचा भार
द्रौपदीचा करून चुडा घातला हातात
घाली पांडवांच्या पाच अंगठ्या पाच बोटात
रावणाच करून पटा घातला कमरेला
भरत शत्रु गन दोघे तोरड्याचा भार
लव अंकुशाचे करून जोडवे घालती बोटात
तिन्ही तालाची खोलून पेटी तीन केला शिंगार
शंकराचे धरून नंदी वर बसली ती नार
लेबल: देवीची गाणे, नवनाथ गाणं

