आई नटली शिंगारानी
आई नटली शिंगारानी
आई चंद्र सूर्या परी तेज दीसे शोभुनी
डोहीला टोप कानात झुबा
नाकात आई शोभे मैबुबा
कानात झुबा नाकी नथनी दीसते शोभुनी
आई लक्ष्मी आई माझी नटली शिंगारानी
गळ्यात गाठलं येळे दंडावर
चुडा गं आई शोभे हातावर
दंडात येळे हातात चुडा दीसतो शोभुनी
आई लक्ष्मी आई माझी नटली शिंगारानी
कंबरी पट्टा पायात तोडे
बोटात आई शोभती जोडे
पायात तोडे बोटात जोडे दीसती शोभुनी
आई लक्ष्मी आई माझी नटली शिंगारानी
खन नारळानं आई भरीन मी वटी
साडी चोळी आणली आई साठी
हिरवी चोळी हिरवी साडी दीसते शोभुनी
आई लक्ष्मी आई माझी नटली शिंगारानी
लेबल: देवीची गाणे

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
Hi
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ